---Advertisement---

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले प्रत्युत्तर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : विधानसभेतील विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये, नोटीबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोप मलिक यांनी केला. आता, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपाला एका वाक्यात उत्तर दिले आहेत.

मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटने उत्तर दिली आहे. त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असेही त्यांनी म्हटलं आहे. खूप पूर्वीच एक गोष्ट शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. कारण, तुम्ही गलिच्छ व्हाल आणि डुकराला तेच आवडेल, अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, पण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केली आहे. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा टोला स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!