---Advertisement---

संपाच्या तणावातून एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

सातरा : सद्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला जात नाहीये. यामुळे सद्या एसटी कर्मचार्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काही कर्मचारी तणावाखाली आहेत. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहेत. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी काही कारणामुळे आत्महत्या केली आहे. त्यातच आता एसटी विभागातील मेढा आगारातील बसचालक संतोष वसंत शिंदे यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

बस चालक संतोष शिंदे हेसुद्धा मागच्या चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. याच तणावामुळे काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे.

एसटी महामंडळ तात्काळ शासनात विलीन करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. कालच संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्या कारणावरून सातारा आगारात कर्मचाऱ्याचे दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादामध्ये डोक्याला दगड लागल्याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक आम्ही चिकणे हे जखमी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!