ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. तर राऊत हे वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाही. मात्र संजय राऊत हे अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत या दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काल परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात तब्बल साडेचार तास चर्चा झाली होती.

या भेटीत कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्या संदर्भातही पवार राऊतांकडून माहिती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही बैठक किती वेळ चालेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!