ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार? वाचा सविस्तर..!

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा निघण्याच्या दिशेने पाऊले देखील पडत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक होत आहे. यासाठी परिवहनमंत्री अनिल परब सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहे. या बैठकिसाठी आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, एसटी कर्मचाऱ्यांचे दहा जणांचे शिष्टमंडळ सह्याद्रीवर उपस्थित झाले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यातली चर्चा सकारात्मक झाल्याचं अनिल परब यांनी सांगितले आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत आणि विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत कर्मचा-यांपुढे अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचं कळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!