---Advertisement---

ब्रेकिंग…! हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बीपीन रावत यांचा निधन

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितली. तामिळनाडूमध्ये  हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाले, त्यात त्याचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर प्रवास करणारे इतर १३ जणांचा देखील मृ्त्यू या अपघातात झाला आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत ह्यादेखील  या हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रावत हे एका कार्यक्रमाला हजेरी लावून दिल्लीला परत येत होते. त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण प्रवास करत होते. दिल्ली परत येत असताना तमिळनाडू कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथील  जंगलाच्या परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि बिपीन रावत यांचा त्यात मृत्यू झाला. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी सीडीएस बिपीन रावत मधुलिका रावत ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग गुरुसेवक सिंग जितेंद्र कुमार विवेक कुमार बी. साई तेजा हवालदार सतपाल आगाची भडका उडाला अन् झाडांनी पेट घेतला बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते.

वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होते.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!