---Advertisement---

अक्कलकोटमध्ये दत्त जयंतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, पोलीस विभागाने घेतली नियोजन बैठक

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट येथे होणाऱ्या दत्त जयंतीला चार ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि तीस बेरिगेटिंग यासह ५ पोलीस अधिकारी, १०५ पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजेंद्रसिंह गौर यांनी दिली. दत्त जयंती अनुषंगाने उपविभागीय कार्यालय अक्कलकोट येथे प्रशासकीय अधिकारी, मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ ट्रस्ट व पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी माहिती दिली.

बैठकीमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी यावर खास करून नियोजन करण्यात आले. अक्कलकोट शहरात छोटे -मोठे वाहन मंदिर परिसराकडे येऊन गर्दी करणार नाहीत त्या अनुषंगाने नगरपालिकेकडून अक्कलकोट शहरातील महत्वाच्या ठिकाणी मजबुत स्वरूपाचे बॅरेंगेटिंग करण्यात यावेत. तसेच मंदिर परिसरातील महत्वाच्या चार ठिकाणी लाऊड स्पीकर व्यवस्था करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. त्यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी कमलाराजे चौक, फत्तेसिंह चौक, कारंजा चौक, मैंदर्गी नाका, भक्त निवास हत्ती तलाव, समाधी मठ या ठिकाणी लाकडी बॅरेंगेटिंग करण्यात येणार असुन सध्या लोखंडी स्वरूपाचे चाकाचे ३० बॅरेंगेटिंग तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, अन्नछत्र मंडळ, भक्तनिवास, मैंदर्गी नाका, या ठिकाणी वाहनांची गर्दी न होता भाविकांना दर्शन घेणे सुलभ होईल. कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने मंदिर परिसरात चारचाकी वाहने येणार नाहीत ते बाह्य वळणाने बाहेरच जातील. याबाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या.

छोट्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कमलाराजे चौक, हत्ती तलाव जवळ बासलेगाव रोड, श्री स्वामी समर्थ दवाखाना मैंदर्गी रोड, अन्नछत्र मंडळ याच ठिकाणी करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळात असलेली पार्किंग व्यवस्था मैंदर्गी रोडच्या बाहेर पडणाऱ्या गेट मधुनच प्रवेश करेल आणि तेथुनच बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबाबत मंडळाचे सचिव
शाम मोरे यांनी सहमती दर्शविली. मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ यांना डॉ. गौर यांनी मंदिरातील दर्शन रांग, भाविकांना रांगेत पिण्याची पाण्याची व्यवस्था, उन्हात जास्त वेळ थांबावे लागले तर बाहेरील दर्शन रांगेत मंडपची व्यवस्था करण्यात यावी, यासह अन्य सूचना देण्यात आल्या.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि अन्नछत्र ममंडळाचे सचिव मोरे यांनी यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. या बैठकीला तहसीलदार बाळासाहेब सिरसट, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, गोपनीय कार्यालयाचे धनराज शिंदे, गोपनीय कर्मचारी शरद चव्हाण, गजानन शिंदे, वाहतूक अंमलदार सलिम पिरजादे, चिदानंद उपाध्ये आदी उपस्थित होते.

अनुचित प्रकार घडू नये, खबरदारी घ्या

कोठेही अनुचित प्रकार घडु न देता अतिशय चांगल्या पद्धतीने श्री दत्त जयंतीचे नियोजन पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि आम्ही स्वतः हजर राहुन करत आहोत. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, असे तहसीलदार सिरसट यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!