ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षक आणि शिक्षकेतर भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली महत्त्वाची माहिती…. वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात नव्या वर्षात तब्बल ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर भरती प्रक्रियेला लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. तब्बल ३० हजार पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. येत्या नव्या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची आधार जोडी प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर ही भरती केली जाणार आहे.

राज्यात शिक्षक भरती ही रखडली होती. अनेक मुळे ही पात्र असतांनाही भरती बंद असल्याने त्यांना शिक्षक होता येत नव्हते. मात्र, येणाऱ्या नव्या वर्षात राज्याच्या अर्थ खात्याने शिक्षकांच्या ८० टक्के भरतीला मंजुरी दिल्याने पडभरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे. यातील तब्बल ५० टक्के पदे ही तातडीने भरली जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात सांगितले.

केसरकर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांची आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. यानंतर विद्यार्थी संख्या ही स्पष्ट होणार आहे. यानंतर राज्यात ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. आम्हाला शक्य झाल्यास आम्ही १०० टक्के भरती करण्यास तयार आहोत. आधार लिंक करण्याचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण झाले असून हे काम झाल्यावर ही भरती केली जाणार आहे.

राज्यातील शाळा बंद बाबत दीपक केसरकर म्हणाले, राज्यात २० आणि त्यापेक्षा कमी असलेल्या पटसंख्या असलेल्या शाळा आम्ही बंद करणार नाही. पटसंख्येबाबत सर्वेक्षण करण्यात आलेले. त्यामुळे शाळा बंद करण्याबाबद संभ्रम निर्माण झाला होता. चांगल्या वातावरणात आम्हाला मुलांना शिक्षण द्यायचे आहे. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता आहे असे देखील केसरकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!