अक्कलकोट,दि.५ : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या धर्मपत्नी कै.सुवर्णाताई म्हेत्रे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे आयोजित शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले.उपसरपंच काशिनाथ कुंभार व मित्र परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी म्हेत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शितल म्हेत्रे,दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश
म्हेत्रे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना उपसरपंच कुंभार म्हणाले की,अक्कलकोट शहर व तालुक्याच्या विकासात म्हेत्रे परिवाराचे योगदान खूप
मोठे आहे ते विसरून चालणार नाही.त्यात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पत्नी म्हणून सुवर्णाताई म्हेत्रे यांची साथ मोलाची होती.काँग्रेसच्या वाटचालीत देखील त्यांचे महत्त्वाचे योगदान होते,असे त्यांनी सांगितले.
हे रक्तदान शिबिर सलगर येथील कोष्टी समाज मठात पार पडले.यावेळी सरपंच ज्योती डोंगराजे,युवा नेते बाबासाहेब पाटील,प्रवीण शटगार,भीमाशंकर जमादार,आसिफ पटेल,तम्मा धसाडे, विजयकुमार डोंगराजे, इमाम लालखा,
सैपन बागवान,राजकुमार शेळके,पोलीस पाटील श्रीशैल बिराजदार,मल्लू पराणे साहेबलाल लालखा यांच्यासह सलगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.