---Advertisement---

महागाईत आणखी भर ; घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३५० रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे इतर वस्तूंच्या किमती देखील वाढणार आहे.

१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही ३५०.५० रुपयांनी वाढले आहे. राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही २११९.५० तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांना आता मिळणार आहे. मुंबईत एलपीजीची किंमत १०५२.५० रुपयांवरून ११०२.५० रुपये, कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १०६८.५० रुपयांवरून १११८.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. तब्बल ८ महिन्यांनी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!