---Advertisement---

प्रा.धनराज भुजबळ शांत शिवयोगी राज्य भूषण पुरस्काराने सन्मानित

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२८ : श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ नंदगाव यांच्यावतीने देण्यात येणारा शांत लिंगेश्वर आदर्श पैलवान पुरस्कार पैलवान प्रा. धनराज भुजबळ यांना देण्यात आला.यावेळी मठाचे मठाधिपती श्री राजेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.प्रा.भुजबळ हे अक्कलकोट येथील सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानमध्येही अनेक मुलांना पोलीस भरती व नोकर भरती करण्यामध्ये मोठे योगदान आहे. कुस्ती क्षेत्रात देखील त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कार्य केले आहे कुस्ती ही कला जिवंत ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी,
सरपंच रामदास आलूरे यांच्यासह नंदगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!