---Advertisement---

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद !

By team
On: December 22, 2023 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

श्रीनगर: वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी घात लावून लष्कराच्या दोन वाहनांना लक्ष्य केले. या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले. तर जखमी झालेल्या ३ जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. लपलेल्या दहशतवाद्याविरोधात व्यापक शोधमोहीम राबवण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती.

जिल्ह्यातील थानामंडी सुरनकोट रस्त्यावरील सावनी भागातून सुरक्षा दलाचे वाहन जवानांना घेऊन बुफलियाजकडे निघाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. बुफलिया भागातील दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी या भागाला वेढा टाकत तपास अभियान सुरू केले होते. या ठिकाणी दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू होती. अतिरिक्त जवानांचे एक पथक मदतीसाठी जात असताना दहशतवाद्यांनी घात लावून हल्ला केला. जवानांची जीप व ट्रकला लक्ष्य करत गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले, तर ३ जण जखमी झाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!