---Advertisement---

मोठी बातमी : लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर गुन्हा दाखल !

By team
On: December 23, 2023 2:30 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

प्रत्येक व्यक्ती सध्या सोशल मिडीयाच्या युगात वावरत आहे. त्यामुळे प्रत्येक जण युट्युब बघत असतो. यावर अनेकदा तुम्हाला विवेक बिंद्रा नाव तुम्ही पाहिले असेल. विवेक बिंद्रा हे लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याने पत्नीच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्रा यांच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही तर, पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा यांच्या विरोधात १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल केली आहे. बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की, ही घटना ते राहत असलेल्या नोएडा येथील सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी येथे घडली.

७ डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला. यानिका मध्ये आल्याने बिंद्राने तुच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे यानिकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. विवेक बिंद्राच्या पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की, तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!