---Advertisement---

रेल्वेचा मोठा अपघात : ८ डबे रुळावरून घसरले

By team
On: February 17, 2024 4:33 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज सकाळी जखीरा येथे ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे ट्रेन उलटली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला.

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरलेले होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा ​​यांनी सांगितलं की, रूळावर कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य सुरू आहे. परंतु अजून जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल आणि रेल्वेने मदतकार्य सुरू केलं आहे. ही मालगाडी सकाळी 11.55 च्या सुमारास झाखिरा उड्डाणपुलाजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे ती पलटी उलटली झाली आहे. अपघातस्थळावरील एका व्हिडिओमध्ये रेल्वे रुळावरून खाली घसरलेल्या बोगी दिसत आहेत. मालगाडी लोखंडी पत्र्याचे रोल घेऊन मुंबईहून चंदीगडला जात होती, अशी माहिती मिळतेय.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!