---Advertisement---

सोलापुरात तापमानाचा पारा पुन्हा वाढला

By team
On: April 27, 2024 11:03 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर व जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात तापमानाचा पारा जवळपास ४१.२ अंशावर होता. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. दिवसभर घामाचा धारा आणि उन्हाच्या झळामुळे सोलापूरकर हैराण झाले होते.

गेल्या आठवडभरापासून जिल्ह्यात दिवसभर कडक उन्ह आणि रात्री वादळी वाऱ्यासह हलका पाऊस असे समीकरण सुरु आहे. त्यामुळे अनेकवेळा तापमानाचा पारा वर खाली होत आहे. अशा परिस्थिीतीत पुन्हा तापमान वाढत चालले आहे.काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता दर्शविली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना उन्हाळा आणि पावसाळा अशा दोन ऋतुचा आनंद एप्रिल महिन्यातच मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!