---Advertisement---

मोठी बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !

By team
On: July 1, 2024 8:56 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून सोमवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत आता ३० रुपयांनी किंमत कमी होऊन १५९८ तर दिल्लीत १६४६ रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत १६७६ रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये १७५६ रुपयांना मिळणार आहे, आधी त्याची किंमत १७८७ रुपये होती. बदललेले दर आज १ जुलै पासून लागू होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!