---Advertisement---

राज्यातील ११ नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी

By team
On: July 28, 2024 10:32 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी होणार असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सदस्यांना शपथ देणार आहेत. सकाळी विधानपरिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी होणार आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, तर शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने, अजित पवार गटाकडून शिवाजी गर्जे, राजेश विटेकर, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आज शपथ घेणार आहेत.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले होते. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला होता तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!