---Advertisement---

‘घर तिथे लाईट ‘ हा उपक्रम राबवून केला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

By team
On: August 17, 2024 11:04 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील सलगर येथील युवक ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांनी वार्ड क्रमांक ५ भीमनगर येथे खांब तिथे लाईट आणि घर तिथे लाईट हा उपक्रम हाती घेतला आहे.आता पर्यंत त्यांनी स्वखर्चाने ५० हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च करून संपूर्ण भीमनगर प्रकाशमान करून अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा केला.कोरोनाच्या
काळात पुटगे यांनी स्वखर्चाने मोफत सॅनिटायझर,गोळ्या आणि प्रत्येक घरी अन्नधान्य कीट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती.

त्यानंतर स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवश्यक खर्च न करता स्वतःखर्चाने भीमनगरसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे,असे पुटगे यांनी सांगितले.यावेळी परशुराम भगळे,सिद्धाराम दसाडे,जयभीम आरेनकेरी,शिवशरण दसाडे,चंद्रकांत निगंदळ्ळी,सागर दसाडे,कलप्पा चव्हाण,बसवराज पुटगे,कुपण्णा खटगाळे,बसवंत बोरगाव,बसवराज सनादे,आकाश पुटगे,आकाश साखरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!