ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये मूक मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

कलकत्ता येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या महिला डॉक्टरांवर अत्याचार करून मोकाट फिरणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी याकरिता बुधवारी अक्कलकोट मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे काळ्याफिती लावून शहरातून मूक मोर्चा काढण्यात
आला.

हा मोर्चा प्रमुख मार्गावरून ए- वन चौक ,फत्तेसिंह चौक, तूप चौक,कारंजा चौक ते पोलीस स्टेशन असा काढण्यात आला.या मूक मोर्चा मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, विपुल शहा,प्रदीप घिवारे,योगेश वेळापूरकर,प्रदीप बिराजदार ,लिंगराज बोकडे,शिवलीला माळी, दीपमाला आडवीतोटे,इम्तियाज मुजावर,अश्रफअली शेख,आसावरी पेडगावकर,पवित्रा मलगोंडा,सुषमा शिवणगी,साहेरा सलगरकर,सुप्रिया संगोळगी,मंजुषा मेंथे आदिंसह इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली शहा,चंचल जाजू,मलम्मा पसारे,सुवर्णा साखरे आदिंसह वीरशैव महिला मंडळाच्या सदस्यांनी यात सहभागी होत घटनेचा निषेध नोंदवला.पोलिसांना निवेदन दिल्यानंतर सर्वजण तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यासाठी एकत्र आले होते.अक्कलकोट शहरात डॉक्टर वर्गा सोबत इतर घटक या मोर्चेत सहभागी झाला होता. रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटचे पदाधिकारी या मोर्चात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!