---Advertisement---

ग्राहकांच्या खिशाला झळ : सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

By team
On: September 14, 2024 8:47 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

लाडक्या बाप्पासह महालक्ष्मी आगमनामुळे बाजारपेठेत एक चैतन्य पसरले आहे. या काळात मौल्यवान धातूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. सकाळ आणि दुपारच्या सत्रातील भावात मोठा तफावत दिसली. काल चांदीने 3 हजारांची उसळी घेतली तर सोन्यात पण मोठी वाढ झाली. आता अशा आहेत या दोन मौल्यवान धातू्च्या किंमती?

सणासुदीत सोने चांगलेच चमकले. सोन्यात मोठी दरवाढ दिसली. सुरुवातील 10 सप्टेंबर रोजी किंमती 440 रुपयांनी स्वस्त झाल्या. 11 सप्टेंबरला त्यात 380 रुपयांची वाढ झाली. 12 सप्टेंबर रोजी किंचित घसरण झाली. 13 सप्टेंबर रोजी किंमतीत 130 रुपयांची भर पडली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी 5 हजारांनी महागली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी, 10 सप्टेंबरला 1 हजारांनी तर 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. 12 सप्टेंबर रोजी भावात बदल दिसला नाही. 13 सप्टेंबर रोजी 3,000 रुपयांनी चांदी महागली. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,600 रुपये आहे.

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,044, 23 कॅरेट 72,752, 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,783 रुपये, 14 कॅरेट सोने 42,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,111 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!