---Advertisement---

महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला : आठ जणांचा मृत्यू !

By team
On: April 4, 2025 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणाहून अपघाताच्या घटना समोर येत असतांना आता नांदेड येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. आज सकाळी हा प्रकार घडला आहे. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून आमदार राजेश नवघरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत महसुल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला व एक पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि.नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या मजुंरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. यातील 2 महिला आणि एक पुरुष है सुदैवाने बचावले.

दरम्यान, विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे आत ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत असून विहीरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!