---Advertisement---

विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावांची जोरदार चर्चा; निर्णयाकडे लक्ष

By team
On: December 9, 2025 10:33 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून काल ८ डिसेंबर रोजी अधिवेशनचा पहिला दिवस संपल्यानंतर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांसाठी मविआकडून अनुक्रमे शिवसेनेचे भास्कर जाधव आणि काँग्रसेचे सतेज पाटील यांच्या नावावर एकमत झाले असल्याची माहिती समोर आहे. पण अशातच आणखी दोन सरप्राइजिंग नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीत राजकीय पेच निर्माण झाल्याची चर्चा नागपूरात सुरू आहे. एका दैनिकाने दिलेल्या बातमीच्या हवाल्यानुसार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभा तर ठाकरे गटाचे अनिल परब यांना विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठीच्या नावांची चर्चा आहे. अचानक ही दोन्ही सरप्राइजिंग नावं समोर आल्याने भाजपच्या राजकीय खेळी चर्चा रंगली आहे.

मात्र, मविआने भास्कर जाधव यांना विधानसभेसेचे विरोधीपक्ष नेते तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेते देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. यासंबधी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांना पत्रही सादर करण्यात आले आहे. या दोघांच्याही नावांवर एकमत झाले असताना अचानक विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावाची चर्चा का होतोय असा प्रश्न निर्माण झाला असताना याबाबत दुसरी एक चर्चा असल्याचे समोर आली आहे.

भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते झाले तर त्यांचे मुख्य टार्गेट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांवर राहील, अशी भीती शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीने असे न होता त्यांचा रोख तिन्ही पक्षांवर असेल, असा एकमतप्रवाह शिंदेंच्यासेनेमध्ये दिसत आहे. भाजपने वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावांवर नव्याने चर्चा सुरू केली आहे. या दोन नावांसह काही मविआ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांमधील विरोधीपक्षनेते पदाच्या निवडीवरून मोठे राजकीय घमासान सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!