---Advertisement---

सांगवी बु ग्रामपंचायतीवर जय जगदंबा पॅनलचे वर्चस्व

On: January 23, 2021 4:05 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु हे गाव राजकीयदृष्ट्या आतिशय प्रबळ  मानले जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर जनतेने विश्वास ठेवत जय जगदंबा सर्वधर्मीय ग्रामविकास(भोसले गट) पॅनेलला स्पष्ट बहुमत दिले असून अत्यंत चुरशीने झालेल्या या चौरंगी लढतीत ९ जागा पैकी ८ जागा जिंकत जय जगदंबा सर्वधर्मीय ग्रामविकास आघाडीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.

पॅनेल प्रमुख संजयकुमार भोसले,मेजर बाळासाहेब भोसले, विष्णू भोसले, माजी सरपंच अबूबकर शेख यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये सरपंच पदाच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली. त्याचा फायदा त्यांच्या पॅनल ला मिळाला. त्यामुळे सत्ताधारी जय जगदंबा गटाचे सुभाष सोनकांबळे, राजिया कागदे, वर्षा भोसले, तहसीन शेख, वासंती सलबत्ते, लक्ष्मण डांगे, काजल राठोड, हे  बहुमताने निवडून आले असून, निवडणुकी पूर्वीच जय जगदंबा पॅनेलचे ३ वार्डातील संभाजी खरात हे बिनविरोध निवड झाले होते. त्यामुळे ८ जागांवर निर्विवाद वर्चस्व जय जगदंबा पॅनेलला मिळाले आहे. तर ग्रामविकास परिवर्तन पॅनल रेड्डी गटाचे १ मुमताज कागदे हे निवडून आले आहेत.

नबीलाल शेख, दादा भोसले, इरफान शेख, सत्तार पाटील, साहेबराव खरात, अंबादास डांगे, रवी राठोड, जैनोदीन पठाण, हाजीमलंग मुजावर, दिलीप भोसले, सुभाष देवकर यांचे मार्गदर्शन जय जगदंबा सर्वधर्मीय पॅनलला लाभले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!