---Advertisement---

गंगाधर आप्पा कापसे यांचे औषध विक्रेता संघटनेसाठीचे योगदान मोलाचे

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर आप्पा कापसे यांनी औषध विक्रेता संघटनेसाठी गेल्या चार दशकांपासून निष्ठेने आणि सातत्याने दिलेले योगदान मोलाचे आहे. सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत संघटनेची बांधणी करणे, माणसे जोडणे आणि संघटनेच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ देणे, हे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार ऑल इंडिया व महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी काढले.

सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात गंगाधर कापसे यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त तसेच ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते कापसे यांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना जगन्नाथ शिंदे म्हणाले की, गंगाधर कापसे यांनी औषध विक्रेता संघटनेच्या जडणघडणीत चार दशकांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. औषध व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपणे, संघटनेच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहणे, सहकाऱ्यांना नेहमी सहकार्य करणे आणि अडचणीच्या काळात संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.

या सोहळ्यास एमएससीडीएचे नवनिर्वाचित पदाधिकारी बसवराज मणुरे, रामदास भोसले, सुनील बंगाळे, अनिल नावंदर, वैजनाथ जागुष्टे, सुनील छाजेड, पंकज नानवणी, अजित पारेख, प्रशांत सिंदगी, डॉ. राजू वाले, अमोल वाघुले यांच्यासह कापसे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे मनीष बलदवा यांनी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये प्रशांत खलिपे यांची अध्यक्षपदी, राजेश विरपे व सिद्धेश्वर घाळे यांची सचिवपदी, तर राहुल काळे व सुनील लालवाणी यांची खजिनदारपदी निवड जाहीर करण्यात आली. तसेच बसवराज मणुरे, मल्लिकार्जुन मसुती, प्रफुल्ल इचगे, सुनंदा लड्डा, राम जोडमोटे, अनंत चीटकुल आणि राजेंद्र बोंबरा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रमाला अक्कलकोट संघटनेचे शिवानंद नंदर्गी, स्वामीनाथ गुरव, शक्ती पाटील, सचिन पाटील, विलास कोरे, गुरुपादप्पा आळगी, एजाज मुतवल्ली यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी आणि केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज मणुरे यांनी केले, तर सिद्धेश्वर घाळे यांनी आभार मानले.

सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि ८१ व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी गंगाधर कापसे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ भविष्यातही संघटनेला मिळत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात कापसे यांच्या चार दशकांच्या संघटनात्मक सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!