---Advertisement---

विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका फरार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Follow Us:
---Advertisement---

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे विश्वासाचे असते. मात्र उत्तर प्रदेशातून या नात्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेने चक्क आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याला सोबत घेऊन पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी इयत्ता अकरावीत शिकत असून त्याचे वय अवघे 15 वर्षे आहे. मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. यानंतर शिक्षिका त्याला घेऊन गेल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिक्षिकेविरोधात अपहरण आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. रुपाली असे आरोपी शिक्षिकेचे नाव असून ती गेल्या वर्षभरापासून संबंधित शाळेत शिकवत होती.

विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने सोबत नेल्याचा आरोप आहे, तो याच शाळेच्या संचालकांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विद्यालयात घडली आहे.

दरम्यान, आरोपी शिक्षिका रुपाली आणि अल्पवयीन विद्यार्थी दोघेही बेपत्ता असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, ‘आम्हाला आमचा मुलगा सुखरूप परत हवा आहे,’ अशी आर्त मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांकडून केली जात आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!