---Advertisement---

झोका खेळत असताना अक्कलकोटमध्ये सात वर्षाच्या मुलीला बसला फास ! दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट दि.२५ : ( मारुती बावडे ) अक्कलकोट हद्दवाढ भागातील वसाहतीमध्ये एक ७ वर्षीय मुलगी झोका खेळत असताना फास बसून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. कुरनूर येथे कार्यरत असलेल्या डॉ. शिवपुत्र गुरव यांची मुलगी आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मयत कु. अभिलाषा शिवपुत्र गुरव वय -७ वर्ष (रा.समर्थ विहार मैंदर्गी रोड, एमआयडीसी अक्कलकोट) रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आई,वडील शहरातील खंडोबा मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. तेव्हा मुख्य दरवाजा बंद होता.दोन दिवसापूर्वी आलेल्या पाहुण्यांच्या लहान मुलींसाठी साडीचा झोका बांधण्यात आला होता. त्यावरून अभिलाषा ही झोका खेळत होती. तेव्हा मुलगा बाथरूम मध्ये आंघोळ करत होता. तेव्हा अचानकपणे मुलीला गळ्याला फास बसून मृत्यू झाला आहे. त्यावेळी आई, वडील देवदर्शन करून परत घरी आले असता दरवाजा बंद होता.दरवाजा उघडत नसल्याने पारच्या सहाय्याने दरवाजा तोडून काढले असता मुलीला फास बसलेल्या अवस्थेत लोंबकळत होती.ते तात्काळ काढण्यात आले.ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून शाविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मूळगावी उमदी (ता.जत ) या मूळगावी तिच्यावर रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक तपास सपोनि देवेंद्र राठोड हे
करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!