---Advertisement---

अजित पवारांना धक्का : बारामतीत सुप्रिया सुळे यांचा मोठा विजय 

By team
On: June 4, 2024 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

देशातील सर्वात हायव्होल्टेज आणि लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघ शरद पवार यांनी कायम राखला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्यात लढत होणार अशी चर्चा झाली. काही दिवसातच सुनेत्रा पवार यांना तिकीटही जाहीर झाला.

बारामती मतदारसंघात दोन्ही परिवारांनी जोरदार ताकद लावलेली दिसली. सुप्रिया सुळे यांनी अखेर विजय मिळवला आहे. संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुक जिंकली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक लाखपेक्षाा जास्त मतांनी सुनेत्र पवार यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीमध्येही सुप्रिया सुळेंनी एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. दरम्यान, अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या पाच जागांमध्ये फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!