---Advertisement---

युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, गृहामंत्र्यासह १६ जणांचा मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

युक्रेन : युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यात युक्रेनचे गृहमंत्र्यांसह १६ जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. त्यावेळी कीवमधील बालवाडीजवळ ही दुर्घटना घडल्याने या अपघातात १६ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिसर्स्की यांचा देखील मृत्यू झाला आहे. तर दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, या अपघातात २२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच जखमींमध्ये १० लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!