---Advertisement---

खासदार निधीतील विकास कामाचे चपळगाव येथे उद्या उद्घाटन,सरपंच उमेश पाटील यांची माहिती

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून
सात लाख रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन
विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सरपंच उमेश पाटील यांनी दिली.उद्या (शनिवारी) सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.कार्यक्रमासाठी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी हे कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.या निधीतून संतोष पाटील घर ते बँक ऑफ इंडियापर्यंत सिमेंट रस्ता होणार आहे.यावेळी रिणाती इंग्लिश मीडियम स्कूल व संतोषदादा पाटील मराठी विद्यालय चपळगाव यांच्यावतीने सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा अविष्कार पाहायला मिळणार आहे.या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.राजेंद्रसिंह गौर,उपसरपंच डॉ.अपर्णा बाणेगाव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील,बसवराज बाणेगाव,ग्रामविकास विस्तार अधिकारी सी. एस हुमनाबादकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुख नेते मंडळींची उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!