---Advertisement---

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमुळे उडाली राज्याच्या राजकारणात खळबळ

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान यावरुन राज्यातील राजकारण सध्या चांगलंच रंगताना दिसत आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका असे खळबळजनक ट्वीट केले आहे.

“महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,” असं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!