---Advertisement---

सोलापुरातील दोन्ही जागेबाबत मंत्री पाटलांचा मोठा दावा

By team
On: June 2, 2024 2:32 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

देशभरातील लोकसभा निवडणुकीचा दि.४ रोजी निकाल लागणार असून यापूर्वीच अनेक राजकीय नेत्यांनी आपला अंदाज व्यक्त केला असून यात सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा अशा लोकसभेच्या दोन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील याबाबत आपण आशावादी आहोत. दोन्ही जागा निवडून येतील याबाबत आपण ठाम आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात आता काहीही कल दाखवत असले. तरी महायुतीच्या चांगल्या जागा जिंकून निवडून येतील, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पाटील हे पंढरपूर येथे आले असता एक्झिट पोल बाबत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नुसार एक कल असं सांगतो की, राज्यात 35 च्या पुढे महायुतीच्या जागा येतील, यावर आपण ठाम आहोत, असेही ते म्हणाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे विठ्ठल गाभाऱ्यातील काम पूर्ण झाले असल्याने आजपासून विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने पाटील पंढरपूर मध्ये आले असताना त्यांनी हे विधान केले. मोदीच पुन्हा पंतप्रधान एक्झिट पोलवर वेगवेगळे कल आहेत. याच एक्झिट पोल नुसार देशामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. ही गोष्ट आनंददायी आहे. सोलापूर आणि माढ्याच्या जागेबाबत एक्झिट पोल काहीही कल दाखवत असला तरीही या दोन्ही जागा आम्ही जिंकू याबाबत आपण आशावादी आहोत, असेही पाटील म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!