श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 20 : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी … Read more

कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !

अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी यात्रा पंचकमिटी चे अध्यक्ष तथा सरपंच विलासराव सुरवसे हे होते. यावेळी पंचकमिटी चे सदस्य ज्ञानेश्वर पाटील, मोहन फुलारी, राजाभाऊ … Read more

कोरोना महामारीच्या काळात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे समाजकार्य !

अक्कलकोट, दि.१८ : सध्याच्या संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांना पुनश्च एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोरोना पार्श्वभूमीवर अनेक गरजुंना प्राप्त परिस्थितीत न्यासाकडून अन्नदान सेवा व जयहिंद फुड यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व … Read more

वागदरीत गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त;परमेश्वर यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द

अक्कलकोट, दि.१७ : वागदरीत गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने वागदरी गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी श्री ग्रामदैवत परमेश्वर यात्रेचा रथोत्सव होता. परंतु तो कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला आहे. तरीही गतवर्षी सारखा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक,एक … Read more

वटवृक्ष देवस्थानकडून निराधार व गरजूंना भोजन वाटप; रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने मंदीर समितीचे स्तुत्य उपक्रम

अक्कलकोट – कोरोना लॉकडाऊनच्या  संकटात सापडलेल्या शहरातील निराधार व गरजू नागरिकांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षीही भोजन वाटपाची सुरूवात करत देवस्थानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या उपक्रमात देवस्थानकडून भोजन बनवून ते अक्कलकोट शहरातील निराधार व गरजू नागरिकांपर्यत दररोज पोहोचविण्याचे काम रॉबीनहूड आर्मीच्या … Read more

अक्कलकोट वटवृक्ष मंदीरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा; मंदीर बंद असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट, दि.१४ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अतिशय साधेपणाने आणि मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रकट दिनानिमीत्त कोल्हापूर येथील स्वामी समर्थ लाईट डेकोरेटर्स यांच्या वतीने … Read more

रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि.13:- राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी दि. १४ एप्रिल ते १३ मे २०२१ पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वागदरीची श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.७ : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान महाराष्ट्र मराठवाडा व कर्नाटक सिमेलगत भागात प्रसिद्ध देवस्थान म्हणून परिचित आहे.गेल्या अनेक वर्षाची ऐतिहासिक असलेले श्री परमेश्वर रथोत्सव दरवर्षी अतिशय मोठ्या व उत्साहाने साजरा केला जातो .पण गेल्या वर्षी सारखे यंदा हि कोरोना … Read more

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद;प्रशासनाच्या आदेशान्वये मंदीर बंद करण्याचा समितीचा निर्णय

अक्कलकोट – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदीरात गर्दी होवू नये याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर समितीस प्राप्त झाल्यानंतर दि.५ एप्रिल २०२१ रात्री ८ ते दि.३० एप्रिल २०२१ अखेर रात्री १२ वाजेपर्यंत वटवृक्ष मंदीर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवणेबाबत … Read more

वटवृक्ष मंदिरात हुताशनी (होळी) पौर्णिमेला भाविकांची अल्प उपस्थिती;कोरोनामुळे भाविकांची संख्या घटली

अक्कलकोट दि.२८: येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वर्षातील सर्वच पौर्णिमांना भाविकांची प्रचंड गर्दी असते, परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील पौर्णिमे पासून यंदाच्या होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरातील सर्वच पौर्णिमा कोरोनाच्या सावटाखाली आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम येथील वटवृक्ष मंदीरातील भाविकांच्या गर्दीवर झाला आहे. परिणामी हुताशनी (होळी) पौर्णिमेदिवशी वटवृक्ष मंदिरात होणाऱ्या … Read more

Don`t copy text!