---Advertisement---

मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक : महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना ११ लाख रुपयाची मदत

By team
On: October 18, 2025 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे या भावनेतून महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेकडून 11 लाख रुपयाचा चेक सीएम फंडासाठी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर मुंबई विमान सेवेचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सोलापूर येथे आले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यानी 11 लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, संचालक नितीन बिज्जरगी, विलास कोरे, विक्रम शिंदे, मिलन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अक्कलकोट, सेमी इंग्लिश विभाग, अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हन्नूर, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय अक्कलकोट येथील शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच स्वामी विवेकानंद नागरी सह.पतसंस्थेचे व मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून दिल्याबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, जूनियर कॉलेज विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेतील सर्व शिक्षकांनी कृतज्ञता भावनेने अतिवृष्टी भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून दिलेली रक्कम लाख मोलाची आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.

 

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!