---Advertisement---

डीआरआयची मेगा कारवाई ; १९२ कोटींचा मेफेड्रोन कारखाना उद्ध्वस्त !

By team
On: December 10, 2025 10:44 AM
Follow Us:
---Advertisement---

वर्धा : वृत्तसंस्था

महसूल गुप्तवार्ता संचालनालयने विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई करत 192 कोटी रुपयांचा मेफेड्रोन निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ या कोडनेमखाली राबवलेल्या मोहिमेत कारंजा (घाडगे) तालुक्यातील निर्जन जंगलात लपवून ठेवलेला गुप्त ड्रग्ज प्लांट सापडला.

डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला असता तिथे पूर्ण क्षमतेने चालू असलेला मेफेड्रोन कारखाना उघडकीस आला. या ठिकाणावरून 128 किलो तयार मेफेड्रोन आणि 245 किलो प्रिकर्सर केमिकल्स जप्त करण्यात आले. मेफेड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 192 कोटी रुपये असल्याचे अंदाज आहे.

यासोबतच रिऍक्टर्स, मोठी भांडी, ड्रग्ज प्रक्रिया उपकरणे आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान तिघांना अटक करण्यात आली असून, यातील मुख्य आरोपी स्वतःच या ऑपरेशनचा फायनान्सर आणि केमिस्ट असल्याचे अधिकारी सांगतात. कुणालाही संशय न यावा म्हणून गावातील साध्या घराप्रमाणे दिसणाऱ्या शेडमध्ये हा प्लांट चालवला जात होता. डीआरआयने या वर्षात उद्ध्वस्त केलेला हा पाचवा ड्रग्ज निर्मिती कारखाना असून, ‘नशामुक्त भारत’ मोहिमेला चालना देण्यासाठी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या ऑपरेशनमुळे अमली पदार्थांच्या तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!