---Advertisement---

गौतम अदानी ठरले जगातील सर्वात कोट्याधीश, अंबानीनाही टाकले मागे

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : अदानीने समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकला आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये चुरस दिसून येत होती.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हंटलय की, बंदरे, विमानतळ, खाडी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमुख असणाऱ्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. यासोबत अंबानी यांची एकूण संपत्ती हे ८७.९ बिलियन डॉलर्स इतकी आहे. गौतम अदानी यांच्या खाजगी संपत्तीमध्ये १२ बिलियन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!