---Advertisement---

मंत्री आदिती तटकरेंनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राज्याच्या विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांनी तटकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.

यावेळी बोलताना तटकरे यांनी आज पर्यंतचे आपल्या सामाजिक, राजकीय, जीवन वाटचालीत सर्वांचे सहकार्य व स्वामींचे कृपाशीर्वाद लाभत राहिलेले आहे. यापुढेही स्वामींची कृपादृष्टी अशीच राहावी याकरिता स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, मुख्याधिकारी सचिन पाटील, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, स्वामीनाथ बेंद्रे, अविराज सिद्धे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, गिरीश पवार, रवी मलवे, श्रीकांत मलवे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!