---Advertisement---

नववर्षाची लाडक्या बहिणींना भेट! खात्यात १५०० रुपये जमा, पण उर्वरित हप्त्यांचा प्रश्न कायम

By team
On: January 1, 2026 11:50 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : नवं वर्ष सुरू होताच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अखेर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात एका महिन्याचा हप्ता म्हणजेच १,५०० रुपये जमा झाल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सुमारे दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असून दरमहा १,५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तीन महिन्यांचे एकत्र ४,५०० रुपये मिळतील, अशा चर्चाही सुरू होत्या. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

अखेर ३१ डिसेंबरपासून ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे पैसे कधी मिळणार, याबाबत अद्यापही सरकारकडून स्पष्ट घोषणा झालेली नाही. त्यामुळे एकीकडे आनंद असला तरी उर्वरित हप्त्यांची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, महिलांना आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे बँकेच्या अधिकृत ॲपद्वारे किंवा बॅलेन्स तपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!