---Advertisement---

…अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन : मंत्री नितेश राणे !

By team
On: April 18, 2025 9:38 AM
Follow Us:
---Advertisement---

मैंदर्गी : प्रतिनिधी

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व राज्य आहे आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत मशिदींवर आणि अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करायलाच पाहिजे अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन असा इशारा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज हिंदू विराट सभेत व्यक्त केले

येथे श्री शिवचलेश्वर मंदिरासमोरील मैदानावर सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू विराट सभेला उदंड प्रतिसाद मिळाला.. व्यासपीठावर ना.नितेश राणे, गोपीचंद पडळकर बसवनगौडा पाटील आमदार सचिन कल्याणशेट्टी शहाजी पवार सुरेखा होळीकट्टी आणि मठाधिपती श्री नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी,श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी.श्री बसवलिंग महास्वामीजी अक्कलकोट श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू श्री मृत्युंजय महास्वामीजी शहाजी पवार शिवराज गायकवाड श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवराज जकापुरे सुधीर बहिरवाडे उपस्थित होते.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हणाले काळाची पावलं ओळखून जातीपाती सोडा आणि हिंदू म्हणून एकत्रित या.असे आवाहन केले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले लव्ह जिहाद हा फार मोठा धोका आहे आता जमिनीवर हक्क सांगत आहेत जन्म नियंत्रण आणि धर्मांतरण कायदा आला पाहिजे. आमदार बसवनगौडा पाटील यांनी कर्नाटक महाराष्ट्र वाद निर्माण करणार्यावर टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक संबंध सांगितला.महाराष्ट्रात भाजपा यश मिळाले ते हिंदू जनजागृती झाल्याने.त्याने वीरशैव आणि लिंगायत हे हिंदू आहेत एकीचे बळ महत्वाचे आहे

पुढे बोलताना  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना सर्वांना सारखाच न्याय देते तो मान्य करायलाच हवा आमचं सरकार हिंदू समाजाने निवडून दिले.मैंदर्गी येथे लॅन्ड जिहाद चालू आहे.भगवा फडकतोय तो वर हिंदू सुरक्षित आहे.एकातरी मोहल्यात शिवजयंती साजरी होते का ॽ अधिकार्यांनी योग्य भूमिका घ्यावी . अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करतात .या विराट सभा ऐकली झोपी गेला असे नको जागृत रहा असे आवाहन केले.

यावेळी. माजी नगराध्यक्ष तुकप्पा नागुर युवा उद्योजक सुरेश नागूर संजय मोरे, महेश शावरी, सिद्धाराम जंगी ,सुरेखा होळीकट्टी,योगीराज बाजारमठ अनिल पाटील लक्ष्मीपुत्र निंबाळ आदी सकल हिंदू समाज तसेच श्रीराम प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!