---Advertisement---

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात

Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात झाला आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला एका टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या 9 जुलैपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी त्या नियोजित दौऱ्यानुसार जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाल्या होत्या. शहरातील पिपल्स बँकेजवळ एका पिकअप टेम्पोने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!