ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हरी नामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापुरात आगमन !

सोलापूर : वृत्तसंस्था

आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलदर्शनाची ओढ घेऊन आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे हरीनामाच्या गजरात आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सपत्नीक माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेत पालखीचे थाटात स्वागत केले.

धर्मपुरी येथील स्वागत सोहळ्यासाठी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याने धर्मपुरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!