---Advertisement---

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात : तिघांचा मृत्यू

By team
On: January 25, 2024 12:09 PM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

राज्यातील समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल 128 वर हा अपघात झाला. ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलसची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री व पहाटेच्या दरम्यान झालेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी येते. त्यात ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा वाहनांचा वेग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे अत्यंत भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालवली जातात तीदेखील या वेगासाठी योग्य नसतात, असेही स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!