---Advertisement---

यूपीएससी उत्तीर्ण कु. रोहिणी उणदे  यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार

By team
On: December 8, 2025 2:39 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा , वर्ग–1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु. रोहिणी इरणा उणदे  यांचा तोरसकर परिवार आणि रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. रोहिणी यांच्या उल्लेखनीय यशामुळे अक्कलकोट शहरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

 

कार्यक्रमास केदार नरोणे, जितेंद्र जाजू, सोनल जाजू, अॅड. सुनील बोराळकर, सागर हलगोदे, डॉ. विपुल शहा, डॉ. प्रशांत वाली, प्रदीप तोरसकर,मिलन तोरसकर यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमादरम्यान जाजू यांनी कु. रोहिणी  उणदे यांची मुलाखत घेऊन त्यांच्या यूपीएससी प्रवासातील अडचणी, अभ्यास पद्धती आणि प्रेरणादायी अनुभवांबद्दल संवाद साधला. उपस्थितांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांची उत्तरे ऐकली. सत्कार सोहळ्यात सर्व अक्कलकोट रोटेरियन आणि उपस्थित मान्यवरांनी कु. रोहिणी उणदे यांना भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी कु. रोहिणी यांच्या मातोश्री महादेवी उणदे तसेच गुरुनाथ नरूणे,राजकुमार नरूणे हेही उपस्थित होते. त्यांच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे रोहिणी यांनी हे यश मिळवल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!