ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंदू नववर्षानिमित्त अक्कलकोट शहरात स्वागत शोभायात्रा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

हिंदु नववर्ष महोत्सव समितीच्यावतीने अक्कलकोट शहरामध्ये मुख्य मार्गावरून स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.रविवारी,सायंकाळी पाचच्या दरम्यान बस स्टँड जवळील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून या शोभायात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.सर्व हिंदु बंधुभगिनीं आपल्या संपूर्ण कुटुंबासहित पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.या शोभा यात्रेमध्ये पारंपारिक वाद्य- विविध समाजाचे समाजदैवत,संत,समाजसुधारक यांचे फोटो लावलेले रिक्षा -विविध पथक दोन रांगेत शिस्तबद्ध पध्दतीने सहभागी
झाले होते.यावेळी भारतमाता कि जय, वंदे मातरम,जय भवानी जय शिवाजी,  हर हर महादेव,जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

शोभा यात्रेच्या मार्गावर वेगवेगळ्या चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मल्लिकार्जुन मंदिर, एस.टी.स्टॅंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वेताळ चौक- हन्नुर चौक- कारंजा चौक- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक,सोन्या मारुती,मेन रोड,फत्तेसिंह चौक,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे समारोप करण्यात आला.यावेळी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले,कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे,बाळासाहेब कुलकर्णी – बबलादकर,लाला राठोड,शिवराज स्वामी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शोभायात्रेच्या समारोपानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील तुळजाभवानी मंदिर परिसरात अन्नछत्र मंडळामार्फत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.यामध्ये सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांनी एकमेकांना हिंदु नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. हिशोब आहे.ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी हिंदू नववर्ष समितीच्यावतीने ऋषिकेश लोणारी,आनंद खजूरगीकर, तम्मा शेळके,संतोष वगाले,चेतन जाधव, संतोष शिंपी,अभिजित लोके,गुरुलिंग येळमेली आदिंसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!