---Advertisement---

गावची बदनामी टाळण्यासाठी अक्कलकोटमध्ये ‘या’ गावाने केली सीसीटीव्हीची मागणी

On: December 14, 2020 4:37 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशय परिसरात अनेक धक्कादायक प्रकार आढळून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील सांगवी बु येथील जलाशयाकडे नुकतेच महिन्यापूर्वी खून करून मृत प्रेत आणुन टाकल्याची घटना व त्यानंतर नुकतेच एक दीड महिन्याचे  बाळ आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना यापुढे वारंवार घडण्याचा संभव असून  यामुळे सांगवी गावाची बदनामी होत आहे तसेच गावचे नाव मलिन होत आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीना सदर ठिकाण सोयीचे झाले असल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे अनुचित प्रकार यास्थळी घडू नयेत,अशी आमची मागणी आहे,असे शिवसेनेचे प्रवीण घाडगे यांनी सांगितले.

गुन्हेगारीवर वचक रहावे येथील वातावरण बिघडू नये याकरिता किमान चार चांगल्या दर्जाचे चार सी सी व्ही कॅमेरा बसवणे गरजेचे असून संपूर्ण पुलाचा परिसर  सीसीटीव्ही क्षेत्रात येईल अशा प्रकारे कायमस्वरूपी कॅमेरे बसवण्यात यावे,अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना शिवसेनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, उप तालुकाप्रमुख प्रवीण घाडगे, अतिश पवार, कुणाल सूर्यवंशी, अंकुश चौगुले, सिद्धू माळी ,वैभव घाडगे, अक्षय घाडगे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!