---Advertisement---

अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी शिरीष पंडित तर सचिवपदी विठ्ठल तेली ; उद्या होणार पदग्रहण सोहळा

Follow Us:
---Advertisement---

 

(मारुती बावडे)

अक्कलकोट, दि.३ : लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या २०२१ – २२ या वर्षीच्या नूतन अध्यक्षपदी शिरीष पंडित यांची तर सचिवपदी विठ्ठल तेली यांची निवड करण्यात आली.यात प्रथम उपाध्यक्ष म्हणून मल्लिकार्जून मसुती,द्वितीय उपाध्यक्ष सिद्धय्या मठ,तृतीय उपाध्यक्ष शिवानंद नंदर्गी, सहसचिव चेतन जाधव, खजिनदार प्रकाश उन्नद,सहखजिनदार राजशेखर हिप्परगी, कमल अळळोळी, प्रकाश पाटील, राजेंद्र हत्ते,शिवपुत्र हळगोदे, शदिद वळसंगकर, मल्लिनाथ साखरे, शिवशरण खुबा, बाबासाहेब निंबाळकर, सुधीर माळशेट्टी आदी मान्यवरांचा पदग्रहण सोहळा होणार आहे. कोविड -१९ च्या सर्व नियमांचे पालन करून या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उद्या दुपारी ४ वाजता हॉटेल सार्थक,हन्नूर रोड अक्कलकोट येथे होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल डॉ.व्यंकटेश यजुर्वेदी,प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांच्यासह रीजन चेअरमन आझम शेख,झोन चेअरमन महेश नळे आदींसह माजी प्रांतपाल जितेंद्र दोशी,डॉ. गुलाबचंद शहा, डॉ.नारायणदास चंडक,डॉ. गुलाबचंद कासलीवाल, अशोक मेहता,प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, अरविंद कोणशिरसगी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन नूतन अध्यक्ष शिरीष पंडित यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!