---Advertisement---

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने केला काँग्रेसला राम-राम

Follow Us:
---Advertisement---

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष सोडून सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभिजीत मुखर्जी यांनी वडील प्रणव मुखर्जी यांच्या जंगीपूर लोकसभा मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व केला होता. परंतु 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

गेल्या काही वर्षात काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यात ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद, हेमंत बिश्वा सरमा या सारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे आता अभिजीत मुखर्जी यांनीही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. परंतु प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी हे आजही काँग्रेस पक्षातच आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!