---Advertisement---

‘मसाप’सोलापूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.२५ : महाराष्ट्र साहित्य परिषद, (पुणे) शाखा सोलापूरची २०२०-२१ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी डॉ.निर्मलकुमार फडकुले संकुलातील शाहीर अमरशेख दालनात संपन्न झाली. ही सोलापूर शाखेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती.

सभेस उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी सर्वप्रथम स्वागत केले. सभेच्या आरंभी मागील सभेच्या इती वृत्तास मंजुरी देऊन शाखेच्या वतीने वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. आगामी वर्षातील विविध कार्यक्रमांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. ‘कोवीड १९’ च्या पार्श्वभूमीवर कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका घेता येणार नसल्या संबंधीचे मध्यवर्ती शाखेचे पत्र सर्व सभासदांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

या सभेत शाखेच्या सर्व सदस्यांनी आपल्या पत्रव्यवहाराचे पत्ते अद्ययावत करण्यासाठी शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. या सभेत वार्षिक अहवाल ऍड.जे.जे.कुलकर्णी यांनी सादर केला तर वार्षिक ताळेबंद खजिनदार बदीऊज्जम्मा बिराजदार यांनी सादर केला. सभासदांपैकी शरदकुमार एकबोटे, फय्याज शेख यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

या वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप अध्यक्ष डॉ.सुहास पुजारी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेची भूमिका स्पष्ट करीत व सध्याच्या ‘कोवीड १९’ च्या प्रतिकूल परिस्थितीतही वाङ्मयीन उपक्रम चालू राहतील, अशी ग्वाही देत केला.

या वार्षिक सर्वसाधारण सभेस कार्यवाह बाबुराव मैंदर्गिकर व मारुती कटकधोंड, कार्यकारिणी सदस्य किशोर चंडक, डॉ. नरेंद्र काटीकर, डॉ. श्रुती वडगबाळकर, वंदना कुलकर्णी, राजेंद्र भोसले व इतर सभासद उपस्थित होते. बिराजदार यांनी आभार मानल्यानंतर सभेची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!