---Advertisement---

ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात ; ६ चिमुकल्यांसह १४ ठार

On: November 20, 2020 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत प्रयागराज – लखनऊ महामार्गावर काल(गुरुवार) रात्री उशीरा ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  यात ६ चिमुकल्यांचा समावेश आहे. लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱ्या वर्‍हाडी मंडळीवर काळाने घाला घातल्याने, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

जीप चालकास डुलकी आल्याने भरधाव वेगातील जीप रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारमधील सगळे लग्न समारंभातून घरी परतत होते. यावेळी अपघात झाल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 बालकांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी 2 तास लागले. अपघातातील मृतांमध्ये 12 जण हे कुंडा कोतवालीच्या जिगरापूर चौसा गावातील आहेत. तर बोलेरो कार चालकासह दोन जण हे कुंडा परिसरातील राहणारे आहे. बाकी इतर गावातीलही प्रवासी गाडीमध्ये होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!