---Advertisement---

जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळले

On: November 25, 2020 12:07 PM
Follow Us:
---Advertisement---

हैदराबाद:  जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणातील जोगतियाल जिल्ह्यातील बलवंतपूरमध्ये घडली. पवन कुमार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी आणि सासरच्या सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पवन कुमार जादूटोणा करत असल्याचा संशय त्यांना होता. त्याची पत्नी कृष्णावेनीचा भाऊ जगन याचा १२ दिवसांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला पवन कारणीभूत असल्याचा संशय त्यांना होता. कोणत्या तरी कारणावरून पवन आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद झाला होता. त्यावेळी पवनने जगनला ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून उघड झाली आहे. जादूटोणा करून पवन आपल्याला इजा पोहोचवणार असल्याचा संशय जगनच्या पत्नीला होता. जगनच्या मृत्यूनंतर त्याची पवननेच हत्या केल्याचा संशय तिने व्यक्त केला होता.

सोमवारी पवन जगनच्या घरी गेला होता. त्यावेळी जगनची पत्नी सुमलता हिने कृष्णवेनीला आतून दरवाजा लावून घेण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या एका महिलेच्या मदतीने त्यांनी पवनला खुर्चीला बांधले. त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळले. कृष्णवेनीने पोलिसांना सांगितले की, घरातून धूर येत असल्याचे दिसले. तसेच पवनच्या किंचाळ्या ऐकू आल्या. तिने तातडीने धाव घेतली आणि घराचा दरवाजा उघडला. मात्र, धुराचे लोट येत असल्याने घरात प्रवेश करू शकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!