---Advertisement---

पेण-खोपोली मार्गावर झालेल्या अपघातात तिण जण ठार ; ओव्हरटेकच्या नादात दिली कंटेनरला धडक

Follow Us:
---Advertisement---

रायगड : कोल्हापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात असतांना ओव्हरटेकच्या नादात कंटेनरला धडकुन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायगड जिल्ह्यात पेण-खोपोली मार्गावर घडली.

यावेळी एका भरधाव ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची इको गाडी समोरून येणाऱ्या एका ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले. तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह पेण पोलिस घटनास्थळी हजार होऊन अधिक तपास करत आहेत. विक्रम गोविंद दिंडे (वय ५०), नागेश विक्रम दिंडे (वय २६), प्राजक्ता नागेश दिंडे (वय २४) अशी या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमी नागरिकांची नावे समजू शकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!