---Advertisement---

तब्बल ११ वर्षानंतर बहिण-भाऊ मुंडेंच्या पुण्यतिथीला येणार एकत्र !

By team
On: June 3, 2025 11:39 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व शिंदेंची सेना एकत्र येवून महायुती सरकार आले असून आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे-धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र येत आहे. यावर पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने त्या पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संबंधी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आता मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे. तसेच धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. धनंजय मुंडे हे तर माझे भाऊच आहेत. त्यामुळे तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहील, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. अकरा वर्षानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहे. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

रामटेक हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. वास्तविक मी 2014 मध्येच माझ्यासाठी हा बंगला मागितला होता. मात्र, तो वरीष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. मात्र यावेळी मला हा बंगला मिळाला त्यावेळी फार मोठे पारितोषिक मला मिळाले असल्याचा आनंद वाटतोय. इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. मुंडे साहेब यांच्या नंतर तो बंगला मला मिळाला आहे. देशात असे एखादेच उदाहरण असेल. हा बंगला एका विचारांचे, जबाबदारीचे प्रतीक असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!